आपल्या प्रभागात कुठला - कुठला भाग येतो आणि लोकसंख्या किती जाणून घ्या
| सांगावा न्यूज| पिंपरी चिंचवड, दिनांक २२ : महाराष्ट्र राज्यातील अ,ब,क,ड या चारही दर्जाच्या महानगरपालिका तसेच नगर परिषदेच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेस विषयी महत्वाचे अपडेट्स आहेत, त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन प्रभाग रचना जाहीर झाली आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग रचनेविषयी सविस्तर माहिती पाहुयात.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एकूण प्रभाग असणार आहेत ३२. म्हणजेच ३२ प्रभागांमध्ये येत्या काळात निवडणुका होणार आहेत हे चित्र स्पष्ट आहे. प्रत्येक प्रभागामध्ये चार सदस्य असणार आहेत. म्हणजेच ४ सदस्यीय प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण १२८ नगरसेवक असणार आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी लोकसंख्या ५३९९० आहे, तर सर्वात मोठा प्रभाग क्रमांक ९ आहे. याची संख्या ५९३८९ इतकी आहे. तर सर्वात लहान प्रभाग क्रमांक ५ आहे, याची संख्य ४८५९१ इतकी आहे. सर्वात मोठा प्रभाग आणि सर्वात लहान प्रभाग यांच्या आकडेवारी संदर्भात, परिषष्ट १ : सदस्य संख्या व प्रभागाची संख्या याची परिगणना या पेजवर एकूण संख्या लिहिलेली आकडेवारी आणि मूळ प्रभाग निहाय नंबरप्रमाणे जाहीर झालेली प्रभाग रचना , प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या यामध्ये तफावत आहे. ही कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे की संबंधित विभागाचा गलथानपणा माहित नाही. सर्वात मोठ्या प्रभागाची लोकसंख्या, परिगणना पेजवर, ५९३८९ इतकी दाखवली आहे. तर प्रभाग निहाय नंबरप्रमाणे जाहीर झालेली प्रभाग रचना यामध्ये ५९३९० एवढी लोकसंख्य दाखवली आहे. इथे एका काउंट चा फरक आहे, तर सर्वात लहान प्रभाग म्हणून परिगणना पेजवर ४८५९१ दाखवली आहे पण , प्रभाग निहाय नंबरप्रमाणे जाहीर झालेली प्रभाग रचना यामध्ये ४९०४९ एवढी संख्या दाखवावी आहे. यामध्ये ४५८ एवढ्या संख्येचा फरक आहे.
म्हणजेच प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना आकडेवारी या चुकीमुळे लोकांना संभ्रमाग टाकणारी वाटत आहे.
दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेसाठी २०११ ची जनगणना विचारात घेतली असून त्या साली पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या १७,२७,६९२ होती. यामध्ये अनुसूचित जाती २,७३,८१० आणि अनुसूचित जमाती ३६,५३५ इतकी होती. परंतु २०२५ सालचा म्हणजे यंदाचा या वर्षीचा सरासरी विचार केला तर ही लोकसंख्या साधारणपणे दुप्पट झालेली असेल. उपलब्ध माहितीनुसार सध्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या, सरासरी २५ ते ३० लाखाच्या घरात गेली आहे. म्हणजेच मतदार संख्या देखील वाढली आहे.
आता महत्वाचा मुद्दा प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचने विषयी :
आता या एकूण ३२ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात कोण कोणती गावं, नगर, गल्ली, मोहल्ला, कॉलनी, सोसायट्या येतात ते अविस्तर पाहणार आहोत. शिवाय प्रत्येक प्रभागात किती मतदार आहेत. यामध्ये प्रभाग वाईज एकूण मतदारामध्ये एस.सी आणि एस.टी मतदारांचा प्रभाव देखील जाणून घेणार आहोत. ते पुढीलप्रमाणे
ही अशी आहे नवीन प्रभाग रचना. ही जरी नवीन प्रभाग रचना म्हंटली तरी जुन्या प्रभाग रचनेनुसारच आहे. यामध्ये फार काही बदल जाणवत नाही. मागील निवडणुकीतील विद्यमान नगरसेवक, निवडणूक लढलेले उमेदवार आणि इच्छुक उमेदवार यांना या प्रत्यके आपापल्या प्रभागाचा तसा अभ्यास आहे. मतदारांची जाण आहे. प्रभागातील कुठला एरिया कुणासाठी फायदेशीर आणि कुणासाठी कठीण याचाही अंदाज असल्यामुळे निवडणूक लढविण्याचा अनुभव असलेले आणि नवीन इच्छुक उमेदवार प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेनुसार कशी ताकद लावायची आणि मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी काय काय रणनीती आखण्याची ती आखणी आजपासूनच सुरू झाली असेल.
प्रभागाची रचना जाहीर झाली आहे. यावर कुणाचे काही म्हणणे असेल तर त्याच्या हरकती, सूचना घेण्यासाठी दिनांक ४ सप्टेंबर पर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर आलेल्या हरकतींवर दिनांक ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान सुनावणी होईल. दिनांक १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान आलेल्या हरकति सूचनांवर विचार करून अंतिम प्रभाग रचना यादी नगर विकास विभागाला सादर केली जाईल. १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान सदर प्रभाग रचना यादी राज्य निवडणूक आयोगाला पाठवली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग आराखड्याला मान्यता दिल्यानंतर . दिनांक ३ ते ६ ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली महापालिका प्रभाग रचना, यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अंतिम यादी आयुक्त प्रसिद्ध करतील.
अशाप्रकारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज नवीन प्रभाग रचना जाहीर झाली याचा सविस्तर वृतांत आपल्यासमोर मांडला आहे. आता कुणासाठी निवडणुकीची धाकधूक आणि उत्सुकता लागली असेल तर कुणासाठी निवडणुकीच्या तयारीसाठी रान तयार झाले असेल. तर काहीजण हैराण झाले असतील. तशी आता हैराण होण्यासारखी स्थिती नाही कारण निवडणुकींच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. तरीपण आज जाहीर झालेला प्रभाग रचना आराखडा हाच निवडणुकीची धावपळ करायला लागणारा क्षण आहे. हे झालं आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांसाठी , पण सामान्य नागरिकांसाठी काय तर आज जाहीर झालेला प्रभाग रचना आराखडा हा सामान्य लोकांना आपला प्रभाग कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा