|सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १९ : मोहननगर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आल्यामुळे वीज वितरण कार्यालय येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि नागरिकांनी निवेदन दिले. सदर निवेदन पुढीलप्रमे :
नागरी हक्क कृती समितीच्या वतीने मोहननगरच्या नागरिकांच्या वतीने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून परिसरातील नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे महावितरणच्या ,गलथान नियोजनशून्य, भोंगळ कारभाराबद्दल आज भोसरी विभागीय कार्यालय निवेदन देण्यात आले.
१)मोहननगर मधील लघुदाब वाहिनी (एल टी) व लाल फीडर बॉक्स यांचा सर्वे करून ते बदलण्यात यावे. तसेच एसटी लाईनबाबत देखील सर्वे करून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात.
२) मोहन नगर मधील ट्रांसफार्मर वर असणारा भार कमी अधिक असतो. त्यामुळे ट्रांसफार्मर व एल टी लाईन वर लोड येऊन वारंवार समस्या येतात. या समस्येचा तज्ञान मार्फत अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात.
३) मोहननगर मधील ट्रांसफार्मरच्या जागेमध्ये वृक्षवल्ली झाडे गवत वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
४) या विभागातील भागाला नवीन जोडल्यामुळे कर्मचाऱ्यांची व शिडी गाडीची संख्या अपुरी पडते. त्यामुळे कर्मचारी व आणखी एक गाडी या विभागात सुरू करावी.
आदी मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजय जगताप, माधव निर्लेकर, महेश पंडित यांनी उपअभियंता एस एस शिरसागर मॅडमला देण्यात आले. कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. लवकरच या विषयासंदर्भात बैठक लावून सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन श्री देवकर व सौ.शिरसागर यांनी दिले.
कळावे
आपला विश्वासू
मारुती भापकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा