| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २० : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात भुजबळ चौक येथे श्री संत सावता माळी रिक्षा स्टॅन्ड यांच्यावतीने श्रावणी सोमवार निमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी आधारस्तंभ धनाजी विनोदे व संस्थापक अध्यक्ष राजू शेठ भुजबळ यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली. संत सावतामाळी रिक्षा स्टॅन्डच्या सर्व रिक्षाचे पुष्पहार घालून त्यांची पूजा करण्यात आली.यावेळी वाकड वाहतूक वरिष्ठ पोलीस थोरात सर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी धनाजी विनोदे म्हणाले की, संत सावतामाळी रिक्षा स्टॅन्ड हे गेले अनेक वर्ष सर्वसामान्य प्रवाशाची सेवा करत असतात. मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा शहरातून आलेल्या प्रवाशांना योग्य मोबदल्यात सेवा पुरवत असतात. अशा रिक्षा चालक मालक यांच्या हातून सर्वसामान्य प्रवाशांची सेवा घडो असे बोलून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्ष मनोज भुजबळ, सल्लागार संतोष भुजबळ, संतोष ढवारे, वसंत शेडगे, मच्छिंद्र ढोले ,वसंत सागरे, पांडुरंग घुले, सतीश शिंदे, महादेव ढवारे, शाहिद शेख,मनोज मोरे ,रवी अडागळे, रफीक शेख, बाळासाहेब थोरात, बाळू गायकवाड, बाबू लोंढे, नागोराव शेवाळे, रामा शिंदे, नागनाथ जाधव ,संजय कांबळे, शैलेश साळवे, सचिन थोरात, गोपीनाथ आघाव, संजय वैराट नंदू वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, पंढरी गायकवाड, धनंजय शिंदे, नितीन वाघमारे ,अविनाश गाडगे, अनिल वारे, विक्रांत भांडवलकर इत्यादी सदस्य उपस्थित होते. सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर संपूर्ण रिक्षा स्टँडच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महापूजाचे आयोजन संतोष ढवारे व वसंत शेडगे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा