Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

लोकहितवादी सेवा संघाची बैठक पार पडली : महागाईमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांवर सविस्तर झाली चर्चा

 

| सांगावा न्यूज | दिनांक ५ : पिंपरी चिंचवड – काळेवाडी येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर सखोल चर्चा केली.

या बैठकीत मान्यवरांनी असे मत व्यक्त केले की, सध्या देशभरात महागाईचा झपाट्याने वाढता आलेख अनेक कुटुंबांना आर्थिक गर्तेत लोटत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले असून, त्यांचे संपूर्ण जीवनच कर्ज फेडण्यात अडकले आहे. परिणामी, मानसिक स्वास्थ्य बिघडले असून, पूर्वी सहज भरले जाणारे बँक हप्तेही आता अडचणीत येत आहेत.

बैठकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली की, समाजसेवा करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली आहे. आर्थिक अडचणींमुळे बहुतेक जण स्वतःच्या समस्यांमध्ये अडकले असून, यामुळे सामाजिक कार्यात मोठी घसरण झाली आहे. देश आर्थिकदृष्ट्या पुढे गेला असला, तरी सामान्य नागरिक कर्जाच्या विळख्यात अडकून केवळ कर्ज पुरवणाऱ्या संस्थांचे गुलाम झाले आहेत. यामुळे देशाच्या सामाजिक प्रगतीऐवजी अधोगती होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर स्थितीवर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यकर्ता कार्यरत राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे स्वतःचे शारिरिक मानसिक व आर्थिक स्वास्थ व्यवस्थित असणे आज काळाची महत्वपूर्ण गरज बाब बनली आहे सामजिक क्षेत्रात चळवळीत मनापासून झोकून देऊन समाजासाठी त्याग स्वरूपात काम करणाऱ्यांची संख्या मोठी व अतुलनीय आहे त्यासाठी वरील गोष्टींची निकड भागवणे कामी लोकहितवादी सेवा संघ विविध प्रकारच्या लोकहिताचे उपक्रम सक्षमीकरणाच्या दृष्टीने सक्रियपणे राबविणार आहे यातून सक्षम कार्यकर्ता सक्षम चळवळ ध्येय धोरण उद्दिष्ट मार्गस्थ होईल सक्षम कार्यकर्ता शारीरिक मानसिक व आर्थिक सक्षम असल्याशिवाय सामाजिक चळवळीत आमुलाग्र बदल घडणार नाहीत यासाठी लोकहितवादी सेवा संघ पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील समन्वय सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था संघटना यांच्याबरोबर त्यांनी सक्रिय कार्यकर्ते यांना सोबत घेऊन प्रगतीचा नवा पायंडा रचणार आहेत 

सामाजिक सक्रिय चळवळीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे कामी लोकहितवादी नवीन समीकरणे समाजापुढे मांडणार आहेत यातून सामाजिक हित झोपासले जाईल तसेच सामाजिक प्रगती साधली जाईल असे प्रतिपादन लोकहितवादी सेवा संघाचे प्रमुख श्री धर्मराज बनसोडे यांनी व्यक्त केले . 

सदर बैठकीत उपस्थित मान्यवर यांनी आपल्या जीवनातील प्रसंगावर अनुभवावर प्रकाश टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या सामाजिक सर्वांगीण अमुलाग्र बदलासाठी लोकांसाठी असणाऱ्या मूलभूत नागरी सेवा सुविधा सक्षमपणे प्रभावीपणे लोकांसाठी अमलात आणताना याच बरोबरीने लोकांचे आर्थिक सक्षमीकरण दर्जात्मक शैक्षणिक धोरण पार पडणे कामी सक्षम सामाजिक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सक्रियपणे पुढे आले पाहिजे व सक्षम समाजाची निर्मिती करून लोकहिताची कामे मार्गी लावली पाहिजे अशी मते भावना उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांनी विशद केली .

या बैठकीस अजय लोंढे, श्रीहरी सोनकांबळे, धर्मराज बनसोडे, विशाल वाघमारे, समद शेख, दिपंकर कदम, विकास वाघमारे, राहुल गायकवाड, राजू अत्तार, अविनाश राय, अतिश दुधावडे, अशा वायदंडे, राजेश दास, शशिकांत भाबळ, सुमित बिस्वास, विनय सोनवणे, सतीश अडागळे, अशोक देवेंद्र, बेबीना बेहेरा आणि सरस्वती अकलूजकर हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन लोकहितवादी सेवा संघाने केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर