Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ५ ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला. 

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत पिंपरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना सामान्य करातील सवलत देणे, वैद्यकीय विभागासाठी इंटेन्सव्हिस्ट संवर्गातील पदे ११ महिन्याच्या कालावधी करिता कंत्राटी पद्धतीने भरणे, महापालिका रुग्णालयात कार्डीयाक डोल्पर / २ डी युको व थेडमिल टेस्ट सेवा उपलब्ध करून देणे, प्रभाग a मधील जलनि:सारण नलिकांच्या वार्षिक ठेकेदारी पद्धतीने साफसफाई करणे व चोक अप काढणे कामास मुदतवाढ देणे, धर्मवीर संभाजी महाराज पुतळा परिसरात शंभू सृष्टी उभारणे व अनुषांगिक कामे करणे, कॉन्फेरंन्स ट्रेनिंग अर्बन सस्टेनेबल मोबिलिटी नियीजन करणे, डूडूळगाव येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दुर्लभ घटकांसाठी निवासी गाळे बांधणे व प्रकल्पातील सदनिकांच्या किचन खिडकी, बाल्कनी पेसेज व ओएचडब्युटी वेस्टर्न कमोड बसविणे, २०७ बालवाड्यांमधील  विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवठा करण्यासाठी अन्नामृत फाउंडेशन यांना २ महिन्याची मुदत वाढ देणे, उद्यान व क्रीडा विभागाकडील २०२५-२६ च्या मूळ अंदाज पत्रकात कामांच्या नावांचा समावेश अकारेण तरतूद, वाढ व घट मान्यता घेणे शिफारस करणे, क्रीडा विभागाकडील २०२५-२६ च्या मूळ अंदाज पत्रकामधील तरतुदीमध्ये घट/ वाढ करणे, पिंपरी चौक येथे माता रमाई पुतळा उभारणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी वास्तुविशारद यांची नेमणूक करणे, मनपा कार्यक्षेत्रात नव्याने विकसित करण्यात आलेले रस्ते दुभाजक व आवश्यक ठिकाणी पोयता माती पसरविणे,निविदेतील शिल्लक कालावधी करिता वाढीव खर्चास मान्यता देणे, अ क्षेत्रीय कार्यलयांतर्गत उद्याने देखभाल करणे, प्रभाग २१ मधील रुग्णालय इमारती मधील स्थापत्य विषयक दुरुस्ती कामे करणे, क्रीडा संकुल येथे उभारलेल्या सी सी टीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर दुरुस्ती देखभाल करणे, अग्निशमन व माध्यमिक विभागाकरिता अनुक्रमाने ५ व १३ डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्ती करणे, तालेरा रुग्णालयातील विविध कामाकरिता हाय व्ह्क्युम सेक्शन मशीन खरेदी करणे, अ गटातील वाहनाचे दुरुस्तीकरिता एजन्सीची नेमणूक करणे, भामा आसखेड पाणीपुरवठा जलवाहिनी योजनेला अडथला ठरणारे उच्च दाब पॉल हलविणे, कला खडक व ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे विद्युत विषयक कामकाज करण्याच्या सुधारित खर्चास मान्यता देणे, मुख्याध्यापक शिक्षण संवाद सत्र कार्यक्रमासाठी भोजन व्यवस्थेच्या खर्चास मान्यता देणे, माध्यमिक विद्यालयातील विविध परीक्षेकामी प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका व आवश्यक स्टेशनरी साहित्य छपाई कामास मान्यता देणे, माध्यमिक विभागाकडील १० वि विद्यार्थ्यांना जागृती बचत गट व गुरु कृपा महिला बचत गटामार्फत शालेय पिशवी (bag ) खरेदीच्या खर्चास मान्यता देणे, २०२४ -२५ च्या आर्थिक विवारणास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

याशिवाय शहरातील संरक्षित क्षेत्रातील मालमत्तांना सामान्य करत सवलत देणे, औद्योगिक इमारत कंपनी, कारखाने, व्यवसाय अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्राचे सेवा शुल्क निश्चित करणे, महापालिका आवारातील उपहारगृह ची जागा ५ वर्षाकरिता भाडेतत्वावर देणे,  रावेत येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दुर्लभ घटकांसाठी निवासी गाळे बांधणे प्रकल्प ठेकेदाराकडून ॲडव्हान्सची मूळ रक्कम वसूल करणे, जगतगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे सुरु करणायत आलेल्या संगीत विभागास प्रतिवर्षी २५ लाख रुपये रक्कम उपलब्ध करून देणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कलाकृती करून निर्माण केल्या जाणाऱ्या बॉलीवूड पार्कचे स्थळ बदलणे ,मनपा रुग्णालयांसाठी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिका-यांची ११ महिन्यांसाठी नियुक्ती करणे, पालिकेच्या भंगार साहित्यांची विक्री लिलाव समितीच्या निर्णयानुसार ई लिलाव करण्यास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर