| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १६ : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे महानगरपालिका नवीन मुख्यालय हे चिंचवड येथे उभारले जात आहे. सदर महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करावा यासाठी माजी नगरसेवक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
मारुती साहेबराव भापकर
कालीमाता मंदिरा शेजारी
मोहन नगर चिंचवड पुणे १९
दि.०९/०९/२०२५
प्रति,
मा.श्री शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक,
पिपरी चिंचवड महानगरपालिका,
पिपरी पुणे १८
विषय:-- चिंचवड स्टेशन येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर किल्ले रायगड येथील (होळीचे मैदान) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या स्थापनेबाबत सन २०२५-२६ साठीचे अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद होणे बाबत.
मा.महोदय,
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाची नवीन इमारत चिंचवड स्टेशन येथे उभारण्यात येत असून, हे काम अतिशय जलदगतीने सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे संपूर्ण नियोजन या इमारतीतून होणार आहे. या इमारतीत महापालिका आयुक्त त्यांचे प्रशासन, तसेच महापौर पदाधिकारी नगरसेवक, तसेच आपल्या शहरातील आमदार खासदार हे याच इमारतीतून शहराचा कारभार पाहणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कामकाज होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे राज्य रयतेचे आहे. या इमारतीतून स्वच्छ पारदर्शक लोकाभिमुख भ्रष्टाचार विरहीत कामकाज व्हावे, महापालीकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या इमारतीतुन कामकाज करताना जातीय, धार्मिक विद्वेष न ठेवता सर्व समावेशक, सर्वांना न्याय देण्यासाठी हा शिवप्रभूंचा पुतळा कायम प्रशासन व लोकप्रतिनीधींन स्फूर्ती व प्रेरणा देईल.
दुर्गराज किल्ले रायगड येथील (होळीचे मैदान) युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचातील कोहीनुर हिरा ठरुन या शहराच्या नावलौकीकात भर घालेल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२५- २६ साठीच्या आगामी अंदाजपत्रकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी व चौथर्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद ठेवावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
मारुती भापकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा