Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

भाजपचा शिलेदार राष्ट्रवादीच्या छताखाली! राजकीय तापमानात वाढ!

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २२ : पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आता चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. अजितदादा पवारांनी मध्येकांशी बोलतांना सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी आपण युतीत नसलो वेगवेळे लढलो तरी एकमेकांचे शिलेदार खेचायचे नाहीत. तरीही भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे तसेच इतरही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. याचा परिणाम म्हणून संदीप वाघेरे हे भाजपचे माजी नगरसेवक त्यांचा आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पक्ष प्रवेश झाला. याप्रसंगी नाना काटे ज्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका निवडणूक प्रचाराची धुरा आहे ते देखील उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने संजोग वाघेरे यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतल्यामुळेच संदीप वाघेरे हे नाराज होते. ते आणि मी एकत्र एका पक्षात राहू शकत नाहीत अशा भावना देखील माध्यमांमध्ये लोकांसमोर आल्या होत्या. सध्या भाजपचा शिलेदार राष्ट्रवादीच्या छताखाली आल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय तापमानात वाढ होत आहे असे म्हातारा येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा