Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

यात्राकाळात खंडोबा मंदिरात अंदाजे दोन लाख भाविक दर्शनास येत असल्याने आकुर्डी वाहतुकीत बदल!


| सांगावा न्यूज | आकुर्डी, दिनांक २२ : पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी गावचे ग्रामदैवत, कुलदैवत श्री खंडोबा मंदिर हे आकुर्डी खंडोबामाळ येथे असुन सदर ठिकाणी दिनांक २६/१२/२०२५ ते दिनांक २७/१२/२०२५ रोजी यात्रा भरणार असुन सदर यात्रा हि पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. सदर यात्राकाळात खंडोबा मंदिरात अंदाजे दोन लाख भाविक दर्शनास येत असल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने सदर ठिकाणी येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करणे आवश्यक असल्याने वाहतूक पोलिस व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल केला असून नागरिक, प्रवासी व वाहनचालकांनी सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
१) थरमॅक्स चौकाकडुन येणारी वाहतुक ही आर.डी. आगा मार्गाकडुन गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येवुन तेथील टी जंक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडुन परशुराम चौकाकडुन मोहननगर चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) परशुराम चौकाकडुन येणारी वाहतुक हि खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातुन आर.डी आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शन वरुन उजवीकडे वळुन इच्छित स्थळी जातील.
३) चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातुन येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून सरळ थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असुन सदर मार्गावरील वाहणे हि शिवाजी चौक बाजुकडे वळुन इच्छितस्थळी जातील.
४) टिळक चौकाकडुन येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातुन थरमॅक्स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असुन सदरची वाहने सरळ चिंचवड स्टेशन/ दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील तरी वरील प्रमाणे दिनांक २६/१२/२०२५ ते दिनांक २७/१२/२०२५ रोजी दरम्यान पहाटे ०४.०० ते २२.००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा