"चालू" राजकीय घडामोडी भाग : १ सांगावा न्यूज दिनांक २२ डिसेंबर २०२५ | संपादक : विनय सोनवणे |
मशाल काही पेटना
धनुष्यातून बाण सुटना
चिखलात तर कमळ दिसतात
घड्याळाचे काटे का रुसतात!
घड्याळाचे काटे रुसले आणि रुतले तरीही
हात कुणाचा हातात घ्यायचा नाही
तुतारीचा आवाज निघू द्यायचा नाही
निघालाच आवाज तर नगारे बाजू द्या
आपलाच आवाज होणार उद्या!
पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण पाहता अशी ही उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली कविता. या कवितेतील भावनेप्रमाणे भाजपाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण करून ठेवले आहे.
पॉलिटिकल टॅकल! pcmc just cool. भाजप Just Cool म्हणता येईल. त्यांना काही टेन्शन नाही. तर विरोधकही cool आहते पण ते थंड या अर्थाने cool म्हणता येईल. ऐन हिवाळ्यात महानगरपालिकांच्या इलेक्शन आल्यामुळे नैसर्गिक वातावरणात तर थंडी आहेच पण, राजकीय वातावरणात देखील विरोधकांमध्ये हुडहुडी भरवणारं वारं, भाजपाने तयार केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या एक महिना आधीच राजकीय तापमानाचा पारा चढत गेला पाहिजे पण, वातावरण Cool ठेवण्याचं काम शहर भाजप अध्यक्ष आणि भाजपच्या चारही आमदारांनी केलं आहे. अर्थातच राज्याच्या नेतृत्वानेच ती पुरेपूर काळजी घेऊन पिंपरी चिंचवड शहरात मशाली पेटू द्यायच्या नाहीत, घड्याळाचा टायमिंग चुकला तरी चालेल, पण, हात हातात कुणाचा घ्यायचा नाही, काळजी करू नका ताणलेल्या धनुष्यच्या बाणाचा कंट्रोल आपल्या हातात आहे, तुतारीचा आवाजच येणार नाही, कारण हवा आपण काढून घेतली आहे. काहीही झालं तरी शहरात हवा फक्त भाजपचीच! याची पुरेपूर काळजी राज्याच्या नेतृत्वानेच घेतल्यामुळे आमदारांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत इस बार भाजप सौ पार.
नमस्कार सांगावा न्यूज पोर्टलवर आपण वचन करताय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय तापमान. "चालू" राजकीय घडामोडी भाग : १
खरं पाहता भाजपने पॉलिटिकली सगळं टॅकल केल्यामुळे, पॉलिटिकल टेम्प्रेचर अजिबात वाढलेलं नाही. जस्ट कुल आहे. निवडणुकांच्या अगोदर सहा सहा महिने अगोदरच गरम होताना दिसत असलेले वातावरण यंदाच्या निवडणुकीत एक महिन्यावर मतदान आले असताना देखील थंड थंड आहे. भाजपाच्या विरोधात कुणीच दंड थोपटाना दिसत नाही. जे दिसताहेत ते केवळ औपचारिकता पाळीत आहेत असे चित्र आहे. सध्या आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेच्या अगोदरचा शहरातील एकंदरीत हवामानाचा अंदाज घेऊन बहुसंख्य उमेदवार भाजपाच्या तिकिटावर लढ्याला तयार आहेत. तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधकांची भावना अशी झाली आहे की काही केलं तरी आपण जिंकूच शकणार नाहीत तर मग खर्च करायचा कशाला. जी काही शक्ती खर्ची करायची आहे ती भाजपचे तिकीट मिळविण्यात करू अशा मानसिकतेचे उमेदवार उघडपणे बोलू लागले!
महानगरपालिका निवडणूक २०२६ केवळ नुरा कुस्ती होणार! भारतीय जनता पार्टीला तुल्यबळ असा विरोधक फाईट करायला उरला नाही. पिंपरी चिंचवड शहरात भाजपच बाजी मारणार हे असं वातावरण टाईट व्हायला कारणही तशीच आहेत.
यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्या, निदर्शनास येत की, निवडणुका तोंडावर असताना गेल्या महिनाभरात कुठल्याच विरोधकांनी खंबीरपणे भारतीय जनता पार्टीला काउंटर केलेले दिसत नाही.
मागील चार वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राज असले तरी त्या अगोदर सत्ताधारी पक्ष कुठे चुकला तर त्यांना धारेवर धरलेले पाहायला मिळाले नाही. आणि प्रशासकीय सत्ता असतांना देखील त्यांच्यावर कंट्रोल राज्य शासनाचे असल्यामुळे थेट भारतीय जनता पार्टीला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आणि कर्जबाजारी पानाच्या मुद्द्यांवरून जेरीस आणता आले असते.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अशी अवस्था आहे की, आपण राज्यात युतीत आणि शहरात कुस्तीत. टीका करावी तर कुणावर, सत्ताधाऱ्यांवर टीका करावी तर आपणही सत्तेत आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची धारच प्रचारात दिसणार नाही अशी परिस्थिती आहे.
महापालिकेत भ्रष्ट्राचार झाला अस म्हणावं तर प्रशासकीय राजवटीत आपण सत्तेत आहोत. शहरातील पायाभूत सुविधांचा अभाव हा मुद्दा पुढे घेऊन यावे तर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत. दोन्हीकडून गळचेपी झाली आहे. प्रचारात उतरायचे तर काय मुद्दे घेऊन उतरायचे. मतदारांसमोर जायचे तर विरोधकांवर काउंटर करावाच लागेल. पण कुठले मुद्दे घेऊन काउंटर करायचे हा प्रश्नचिन्ह आहे.
राष्ट्रवादी अजित पवार यांनी निवडणुकीत बोलायचे दरवाजे बंद झाले आहेत अशी परीस्थिती दिसत आहे. आम्ही कामे केली म्हणावं तर भाजप म्हणताय सत्तेत आम्ही आहोत अम्हिच केली. भाजपाने कामे नाही केली म्हणावं तर सत्तेत आपण आहोत.
Pcb न्यूज ला दिलेल्या एका मुलाखतीत भाजपचे शहरातील नेते एकनाथ पवार पवार तर म्हणाले की, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला टीका करायचा, प्रचारात मुद्दे गाजवायचा सुद्धा नैतिक अधिकार उरला नाही. कारण प्रशासन काळात शहराच्या काही मूलभूत समस्या जैसे थे असतील तर त्याची पूर्ण नैतिक जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजितदादांची आहे. असही दादांच्या पक्षाला भाजपाने खिंडीत पकडलं आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव पुण्यातील महार वतनाच्या जमीन घोटाळ्यात आल्यामुळे अजित दादा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला डॅमेज् केल्याचं चित्र सर्वांसमोर खुल आहे.
हे प्रकरण बाहेर आल्यापासून अजितदादा पवारांच्या शहरात ज्या फेऱ्या वाढल्या होत्या. धडाक्यात जनसंवाद बैठका चालू होत्या त्याला खंड पाडून शहरातील दादांच्या फेऱ्याच बंद झाल्या होत्या. त्यानंतर एकही जनसंवाद बैठक झाली नाही. उलट भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांच्या शहरात फेऱ्या वाढल्या, भाजपचे बळ द्विगुणित झाले. दरम्यान मोठ मोठाली खलबतं झाली. परिणाम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक २०२६ साठी भाजपमध्ये सर्वात जास्त इच्छुकांची गर्दी वाढली. या गणिमिकाव्यामध्ये भाजपाचे चारही आमदार आणि शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा वाटा आहेच. आता भाजप म्हणतय सर्वांना बाय बाय टाटा, पिंपरी चिंचवड महापालिकेत आमचाच जास्त वाटा आणि महापौर आमचाच हा करून वादा शहराचे अम्हिच दादा.
नगरसेवकांच्या मुलाखती पक्षाच्या अध्यक्षाने घेण्याची वेळ राष्ट्रवादी अजित पवार गटावर आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धडपड करताहेत पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ ही दादा विरुद्ध दादा अशीच होईल असं राजकीय वातावरण आहे.
राजकीय मैदानात आमने सामने आलेल्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असे हे वातावरण तयार झाले आहे. परंतु सामान्य नागरिकांमध्ये मात्र भाजपाच्या विरोधात रोष पाहायला मिळतो आहे. लयच अती केलं रं भाजपाने, सत्तेचा माज. अशा चर्चा टपरीवर चहा पितांना, बसमध्ये प्रवास करतांना, काट्यावर गप्पा करतांना, मनातल्या लंच ब्रेक मध्ये जेवण करता करता सामान्य लोकांच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. या चर्चेत एखादा कमळावर प्रेम करणारा म्हणतोच. तस न्हाय रे. तस नाही तर मग कस आहे ते तरी सांगा किरे. तो म्हणतो काय करू सांगता येत नाही आणि टीकाही सहन होत नाही. नुसता कालवा कालवा करणार. त्या कालव्यात कुणाच कुनी कळवण खाल्ल तेही कळत नाही. शेवटी सगळ्यांनी एकमेकांच खाल्ल हे लक्षात आल्यावर, तू खाल्ला, मी पण खाल्ल आणि मी पण खाल्ल, आपण सगळ्यांनी एकमेकांच खाल्ल. एकमेकांच बाहेर काढायचं नाही. तू बी चूप आणि मी बी चूप. एकदम बोलती बंद. समोरच्याला बोलायला संधीच दयायची नाही.
खूप मुद्दे आहेत जे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून गारद करता येऊ शकतं. पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मुसक्या आवळून वेसण आपल्या हातात ठेवली आहे अस सर्हसपणे नागरिक बोलत आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये मागील चार पाच वर्षात किती कारस्थानं झाली. कधी नव्हे ते आपली महानगरपालिका कर्जबाजारी झाली. एकेकाळची आशिया खंडातली श्रीमंत महापालिका कर्जबाजारी! सत्ताधारीच पुढे येऊन रेटून सांगताहेत कर्जबाजारी नाही कर्जबाजारू नाही. अरे पण हाय ना कर्ज महापालिकेवर! ते कुणी सांगायचं?
शहरातील dp tp रस्ते अतिक्रमण विभागांची अमानुष कारवाई, स्मार्ट सिटीअंतर्गत झालेला भ्रष्टाचार, शैक्षणिक विभागात dbt मध्ये झालेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार! या सगळ्या गोष्टींवर विरोधक का बोलत नाहीत? प्रश्नचिन्ह आहे.
सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांच्या तोंडांत वळवळ आणि दंडात बाळ ठेवलच नाही का ? तर होय तसच म्हणता येईल.
आता विरोधात, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि वंचित मनसे असा कोणीच प्रभावीपणे या निवडणुकीत भाजपशी फाईट करेल असा विरोधकच दिसत नाही.
शहरातील तुतारीची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अलीकडेच एक पत्रकार परिषद झाली. या संपूर्ण पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. स्वतः शहराध्यक्ष पत्रकार परिषदेला उशीर उपस्थित राहिले. तुम्ही एका बाजूला ईव्हीएम विरोधात, दुबार मतदार याद्याविरोधात सत्याचा मोर्चा काढून खडसावून पुराव्यानिशी दाखवता की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मतदार यंत्रात घोळ होतोय! तरीही निवडणुकीला सामोरे जाता? या, पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी उत्तर दिले की, मग भाजपला बाय द्यायचा का?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धुरंदर ज्याच्या खांद्यावर डोक ठेवून उमेदवार तयारीला लागले होते, ज्या वस्तादावर विश्वास ठेवून पैलवान आखाड्यात उतरणार होते ते वास्तदच भाजपाच्या वाटेवर असल्याची खबर सूत्रांकडून मिळत आहे. दंड थोपटेल्या पैलवानांची सैरभैर अवस्था झाली आहे.
शिवसेना शिंदे गटाची तयारी जोरदार सुरू असली तरी खासदारांचा प्रभाव असलेल्या ठिकाणीच एखाद दुसरे सीट येऊ शकेल एवढ्यावरच धनुष्यबनाला समिती रहाव लागतय की काय अशी अवस्था झाली आहे. युती करावी तर कुणासोबत असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे असं राजकीय वातावरण सांगताय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाली काही ठिकाणी पेठतील पण विरोधकांची राख करू शकतील एवढी मशालीची दाहकता शहरात उरलेली नाही.
एकेकाळी पिंपरी चिंचवड शहरावर राष्ट्रवादीची पकड होती. राष्ट्रवादी चा बालेकिल्ला असलेल पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या तावडीतून सोडवण्यासाठी थोरल्या पवार साहेबांनी आपला एक हुकमी एक्का या निवडणुकीत बाहेर काढला आहे, ते म्हणजे आजमभाई पानसरे. राजकारणाचा तगडा अनुभव, बाजू फिरवण्याची ताकद असलेला मुरब्बी नेता, आता शहराच्या निवडणूक रिंगणात रिंग मास्टर म्हणून काम करण्यासाठी पुढे आले आहेत. या रिंगमास्तराची जादू चालेल का ते येत्या काळातच दिसून येईल.
आपली तरुण फळीच सैरावैरा झाली म्हटल्यावर जुने अस्त्र पवार साहेबांना बाहेर काढण्याची वेळ आली आहे. विरोधकांना निवडणूक तयारीला वेळच न देता निवडणुकीची पूर्ण तयारी झालेल्या भाजपचा आत्मविश्वासमात्र पराकोटीचा आहे.
विरोधी म्हणतील की भाजपाचा हा पराकोटीचा आत्मविश्वास ईव्हीएम मुळे आहे, तर मग ज्या ईव्हीएम ला विरोध करता त्याच ईव्हीएम वर निवडणूक लढायला तयार कसे झालात? याचा अर्थ काय? मतदारांना देखील संभ्रम आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांचे निवडणूक रणशिंग फुंकले आहे. राजकीय आखाडा तयार आहे. पण आखाड्यात भाजपच्या प्रभावाचा पाऊस झाल्यामुळे आखाड्यातील माती ओली झाली आहे. त्यामुळे विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की कुस्ती केली तरी चिखलात लोळायचय, कुस्ती नाही केली तरी राजकीय अस्तित्वाचा धोका समोर दिसतोय.
एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या पारंपरिक भाजपविरोधी पक्षांची ही अवस्था शहरात झाली आहे. त्यांच्या राजकीय चालीची धार बोथट झाली आहे. त्यामुळे विरोधक ,भाजपवर तीक्ष्ण वार करू शकत नाहीत. कोण कुठं गुंतलय , कोण कुठल्या गुतडयात अडकलाय. तो गुतुड सोडवायच्या नाड्या भाजपाच्या हातात आहेत अशी चर्चा सामन्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
उलट शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच सक्रीय होणारा पक्ष सनय छत्रपती शासन चांगलाच active झालेला पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनय छत्रपती शासन चे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधवांचा कॉन्फिडन्स कमालीचा होता. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आणि भाजप नियंत्रित पिंपरी चिंचवड महापालिकेवर तीक्ष्ण ओरखडे ओढून, त्यांनी सनय छत्रपती शासन पक्षाची भूमिका मांडली की, पिंपरी चिंचवड शहराला सिंगापूर सारखे शहर बनवायचे आहे. शिवाय दुसरी पत्रकार परिषद पुणे येथे घेऊन आपल अस्तित्व सिद्ध करतांना नामदेवराव जाधव दिसत आहेत.
त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरीत भव्य सभा घेऊन भाजप नियंत्रित पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रहार करून मोदी आणि फडणवीसांवर भाषणातून तोफा डागल्या. यावरून असे लक्षात येतेय की प्रस्थापिक पक्षांना भाजपने गारद केले असून नवीन उदयास आलेले पक्ष विरोधकांची प्रखरपणे भूमिका घेतांना दिसत आहेत.
वास्तवात मात्र सनय छत्रपती शासन पक्षाला आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागांवर विजय मिळवता येईल ते १६ जानेवारीला कळेलच. तरीदेखील वंचित बहुजन आघाडीने खरोखर ताकद लावली तर त्यांचा हक्काचा शहरात मतदार आहे. ३ ते ४ ठिकाणी धडक सामना करून वंचित भाजपला चीतपट करू शकते. त्यापैकी प्रभाग क्रमांक १९ आणि प्रभाग क्रमांक ९ मध्ये माघार न घेता कडवी झुंज दिली तर बाजू पलटू शकते. अशा आणखी दोन जागा वंचितांच्या हक्काच्या येऊ शकतात केवळ ऐनवेळी वंचिताने माघार घेऊ नये म्हणजे झाले. प्रकाश आंबेडकरांच्या पिंपरीतील एका सभेने शहरातील हक्काचा मतदार जागा केला असून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे.
राहिला मुद्दा सनय छत्रपती शासन पक्षाचा, नव्या विचारांचा पक्ष म्हणून तरुण मतदार आणि ज्यांना बदल झाला पाहिजे असं वाटत असेल त्यांची मतं सनय छत्रपती शासन खेचून आणू शकते. सनय छत्रपती शासन चा प्रचाराचा जोर पारंपरिक प्रचार न करता सोशल माध्यमांवर डिजिटल प्रचार करण्यावर भर राहील असा अंदाज आहे.
इथे एकेकाळी सत्ताधारी असलेली काँग्रेस मात्र पिंपरी चिंचवडच्या राजकीय मैदानात धूसर झाल्यासारखी वाटतेय. वंचितांच्या साथीने मतदारांच्या निदर्शनास येण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे अशा माध्यमात बातम्या येत आहेत. वंचिताने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या युतीचा अनुभव पाहता हे पॉलिटिकल, टिकलं की नाही माहीत नाही.
भाजप बरोबर राज्यात टिकलेली शिंदेंची शिवसेना आणि धाकल्या पवारांची राष्ट्रवादी मात्र महानगरपालिका निवडणुकीत विस्कटली आहे.
मुळात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्यासोबत युतीत राहूच नये अशीच भाजपची भूमिका असेल, कारण युतीत लढलो तर जागावाटकावरून नाराजांची नाराजगी का ओढून घ्यावी. त्यात तर निष्ठावंतांना नाराज करण भाजपला परवडणारे नव्हतं. म्हणून स्टेट भाजपालाच वाटतं होत की पवार पवारांनी एकत्र पॉवर करून लढावं, जागा वाटपावरून त्याने त्यांच्यातले नाराज होऊन त्यांच्यातलीचच पॉवर कमी होऊन पुन्हा फाटाफूट तुटतुट जुळविण्याच्या नादात त्यांचित शक्ती वाया घालवावी अशी त्यापाठीमागची फडणवीसांनी भावना असू शकते.
असा खरच जर डाव टाकला असेल तर..व्हा फडणवीस साहेब. खरे धुरंदर तर तुम्हीच म्हणावं की.
राष्ट्रवादीमध्ये उभी चीर पडल्यानंतर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत धाकटे पवार आणि थोरले पवार एकत्र येऊन निवडणूक लढवतील असा हवामानाचा अंदाज आहे. कदाचित बाजू पलटू शकते. भाजपला चित्पट करण्याची दोन्ही पवारांची पॉवर आहे.
ही पॉवर काय मॅजिक करते, की, पॉलिटिकली टॅकल केलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पार्टीसमोर विरोधी नांग्या टाकतील, याचा परिणाम येत्या १६ तारखेला आपल्यासमोर दिसेलच.
जर मतदारांनीच सत्ता बदल करण्याचे ठरवले असेल तर तिथं कुणाचेच काही चालणार नाही फक्त ईव्हीएम मशीनने चलाखी करू नये एवढीच अपेक्षा.
खरंच पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पडली आणि भाजपचा विजय झाला तर मनःपूर्वक शुभेच्छा, भाजपाचा पराभव झाला तर विजेत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा , या झाल्या जर तरच्या गोष्टी.
सद्या शहरावर भाजपचा प्रभाव आहे. तो प्रभाव कमी करण्यात कोण प्रहार करतय का हार पत्करतय तेही लवकरच कळेल.
सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. नैसर्गिक वातावरणात जशी थंडी आहे तसेच जस्ट cool वातावरण सध्यातरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता चालू असताना दिसत असलं तरी, राजकीय तापमानात हळूहळू वाढ होत जाणार, ऐन हिवाळ्यात तापमानाचे चटके कुणाला बसताहेत तेही आपल्याला पाहायला मिळेलच. मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, भाजपाच्या पॉलिटिकल टॅकल मुळे विरोधकांनी नांग्या टाकल्या काय? कमेंट करून कळवा.
महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने चालू राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा sangavanews.in वाचत रहा सांगावा न्यूज पोर्टलवर बातम्या आणि विश्लेषणात्मक लेख तसेच व्हिडिओ बातम्यांसाठी "सांगावा" हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा