तीन महिन्यात जबरी चोरीच्या चार ते पाच घटना! पोलिस व खरवंडी पोलीस दुरक्षेत्र केवळ कागदावर दाखवायला!___ स्थानिक नागरिकांचा आरोप
| सांगावा न्यूज | पाथर्डी, (प्रतिनिधी) दिनांक २२ : रविवारी दिनांक २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे चोरट्यांनी शस्त्र दरोडा टाकत जवळपास १६ लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. तसेच काही महिला आणि पुरुषांना धारदार शस्त्रांनी जबर मारहाण करत गंभीरित्या जखमी केले आहे. यामुळे मालेवाडी ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असता, मालेवाडी येथील पवळागड, वारे वस्ती येथील झालेल्या चोरीच्या घटनेची कसून चौकशी करत आहेत. चोरट्यांचा मागवा घेण्याचे प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलीस करत असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत अशी माहिती मिळत आहे. पोलिस निरीक्षक पुजारी साहेबांसह त्यांचा स्टाफ आणि श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट निरीक्षक घटनास्थळी भेट घेऊन गेल्याची माहिती येथील ग्रामस्त, सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ कीर्तने आणि प्रा.दादासाहेब खेडकरयांनी सांगावा न्यूज ला दिली.
पूर्वीही मालेवाडीत प्रचंड मोठ्या प्रमाणात चोरी आणि दरोडेच्या घटना घडल्या असून सुद्धा त्या चोरीचा तपास लागला नसल्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाल्याने, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस प्रशासनाने मालेवाडी येथील चोरांचा तपास लावून आरोपींना तातडीने पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"मालेवाडी येथील गावातील शेतकरी कष्टकरी आणि गोरगरीब ग्रामस्थ बहुतांश शेतीवर आणि ऊस तोडणी कामगार असल्याने अत्यंत प्रतिक्रिया परिस्थितीत आपल्या संसारासाठी पई पई जपून ठेवतात. मुलांच्या शिक्षणासाठी काबाड कष्ट करून आयुष्याची जमा पुंजी गोळा करून ठेवतात. अशातच मालेवाडी गावात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जबरी चोरीच्या चार ते पाच घटना घडल्या आहेत. खरवंडी पोलीस दुरक्षेत्र ही फक्त नावाला असून कागदोपत्री चालते असे आरोप ग्रामस्थ करत आहेत. यामुळे खरवंडी कासार येथील पोलीस स्टेशन पूर्ण वेळ चालू राहावे आणि नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करून पूर्ण पोलीस कर्मचारी नेमणूक करण्यात येऊन खरवंडी परिसर आणि वाड्यावर रात्री पोलिसांची गस्त असावी"__ अजिनाथ कीर्तने (ग्रामस्त, सामाजिक कार्यकर्ते)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा