Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २५ मार्च, २०२६

अखेर बारामती विमान दुर्घटनेत गुन्हा दाखल रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक  २५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आलं असून बारामतीमधील अजित पवार   यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकाच्या बंगळुरू  येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नागपुरात बस स्टॉपवरुन चार्जर चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला, ⁠चप्पल चोरीला गेली म्हणून गुन्हा दाखल झाला. ⁠अंगणात झाडाच्या फांद्या आल्या म्हणून गुन्हा दाखल झाला, मात्र अजित दादांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला नाही, ⁠ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असेही रोहित पवार यांनी म्हटले होते.

अजित पवार प्रवास करत असेले मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणी असलेले बॉम्बार्डियर लियरजेट ४५ विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४३ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. हे विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे चालवले जात होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये त्या वेळचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही समावेश होता. या प्रकरणी मृत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो FIR’ म्हणून तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र, FIR नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार, ही दुर्घटना केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे पद्धतशीर उल्लंघन, नोंदींची बनावट कागदपत्रे तयार करणे, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये गंभीर निष्काळजीपणा अशा अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने  सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात  कंपनीची काही विमाने निष्काळजीपणामुळे उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले असून, ती विमाने ग्राउंड करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त  विमानाने सुमारे ४९१५ उड्डाण तास पूर्ण केले होते, जे ५००० तासांच्या अनिवार्य इंजिन ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’  मर्यादेच्या अत्यंत जवळ होते. तरीही कंपनीने व्यावसायिक वापरासाठी विमान चालू ठेवले होते, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा