Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहरातील २० पत्रकार सहभागी होणार


पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेचे पत्रकार उदगीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी सज्ज

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १६ एप्रिल २०२६ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक १८ आणि १९ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने पत्रकार या अधिवेशनास सहभागी होणार असून पत्रकारांच्या आणि समाज हिताच्या विविध विषयांवर चर्चासत्रे, मान्यवरांची मार्गदर्शन, पत्रकारांच्या आणि कुटुंबियांच्या हिताच्या गोष्टी, सद्य राजकीय व सामाजिक परिस्थित यावर विचार विनिमयासह सांस्कृतिक कार्यकर्त्यांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संजय बनसोडे हे स्वागताध्यक्ष आहेत. आमदार रोहित पवार, खासदार संजय राऊत यांच्या प्रकार मुलाखती होणार आहेत. या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे सदस्य पदाधिकारी असे एकूण २० पत्रकार सहभागी होणार आहेत, यामध्ये गणेश मोकाशे (परिषदेचे राज्य उपाध्यक्ष) पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात डिजिटल मिडिया परिषदेचे शहराध्यक्ष विनय सोनवणे, महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, हनुमंत रामदासी , संतोष गोतावळे, पराग डिंगनकर, नितीन कालेकर, विनायक गायकवाड, मारुती बानेवार, अविनाश आदक, अनिल भालेराव, नरेश जीनवाल, संभाजी बारबोले, राहुल जाधव यांच्या सह इतर ज्येष्ठ पत्रकार अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

पत्रकारांच्या आडी अडचणी, पत्रकारितेत कार्य करीत असतांना सामाजिक व राजकीय परिस्थिती, नागरी हिताचे वार्तांकन इत्यादी विषयांवर विचारांची देवाण घेवाण होणार आहे. प्रसिद्ध पत्रकार प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी आवाहन केले आहे. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा