Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ३१ मे, २०२६

लेकीच्या सन्मानासाठी शिवशाही शासन खंबीर! लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी आमची___ युवराज दाखले


लेकीच्या सन्मानासाठी शिवशाही शासन खंबीर! लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी आमची___ युवराज दाखले

| सांगावा न्यूज | इंदापूर, दिनांक ३१/५/२०२६ : भाटनिमगावच्या पीडित मातंग लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी शिवशाही शासन व हिंदू मातंग सेने घेतली असल्याचे लोकसेवक युवराज दाखले प्रसार माध्यमांना सांगितले. इंदापूर तालुक्यात पीडित कुटुंबाला धीर देणारी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर प्रेस नोट प्रसारित करून दाखले म्हणले की, जोपर्यंत आरोपीला फासीची शिक्षा होत नाही तोपर्यंत न्यायासाठी लढा चालूच राहील. आरोपी अमीर महमद सय्यद याला फाशीची शिक्षा ठोठावण्यापर्यंतचा लढा शिवशाही शासन लढणार असून, पीडित लेकीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संघटने घेतल्याची घोषणा यावेळी शिवशाही शासनाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी केली.

युवराज दाखले म्हणाले, "ही घटना ऐकून प्रत्येक मातंग, बहुजन बांधवाचे रक्त सळसळले आहे. गरीब म्हणून हिणवून आमच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या नराधमाला कायद्याने फाशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील समस्त मातंग समाज व बहुजन समाज या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. समाजकंटकांना आम्ही घाबरत नाही. पीडित लेक ही आमची लेक आहे. तिच्या १२ वी, कॉलेज ते नोकरीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवशाही शासन व हिंदू मातंग सेना करेल. तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही तिची सावली होऊन राहू." असे बोलून पीडित कुटुंबाला धीर दिला. कायदेशीर, आर्थिक व मानसिक मदतीचे आश्वासन दिले. "आम्ही असताना तुम्ही एकटे नाही. आरोपीला फाशीच्या दोरीपर्यंत पोहोचवूनच आम्ही थांबणार," असे त्यांनी ठामपणे यावेळी त्यांनी सांगितले.

पीडित कुटुंबियांना भेटीदरम्यान लोकसेवक युवराज भगवान दाखले - संस्थापक प्रमुख, शिवशाही शासन; मुख्य प्रवक्ते व कार्यकारी प्रमुख, हिंदू मातंग सेना, उषामाई कांबळे - महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा, शिवशाही शासन, सुनील (दादासाहेब) झोंबाडे, तात्यासाहेब यादव - तालुका प्रमुख, इंदापूर, शिवशाही शासन, बाळासाहेब चांदणे व इतर प्रमुख पदाधिकारी हे मान्यवर उपस्थित होते.

दाखले यांचा निर्वाणीचा इशारा ;
"आरोपीला ४८ तासांत अटक करून POCSO व ॲट्रॉसिटी चे कठोर कलम लावा. फास्ट ट्रॅक कोर्टात फाशी द्या. अन्यथा इंदापूर बंद करून जनआक्रोश मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. मातंग समाजाच्या लेकीवर हात टाकणाऱ्याचे हात तोडू!" असे युवराज भगवान दाखले यांनी माध्यमांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा