Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २५ जुलै, २०२६

विद्यार्थी आंदोलनाचा विजय; अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा


"विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय" CJP आणि विद्यार्थ्यांचे मोठे यश 

विद्यार्थ्यांनी विश्वगुरुला झुकविले! मोदी सरकार तरुणाईसमोर नतमस्तक ; धर्मेंद्र प्रधानांना खुर्चीवरून खाली खेचले! 

| सांगावा न्यूज | नवी दिल्ली, दिनांक २५ जुलै २०२६ : सिजेपी अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला घेऊन शेवटी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिनांक २५ जुलै रोजी राजीनामा दिला. गेली महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर वर विद्यार्थांनी धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी आंदोलन उपोषण केले होते. त्याला देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी व विविध पक्ष संघटनांनी पाठिंब दिला होता. गेल्या २० तारखेला संसद भवनाकडे कूच करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींवर दिल्ली पोलिसांनी लाठी चार्ज केल्यामुळे देखील केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली होती. संविधानिक व अहिंसेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाने पोलिसांच्या आणि सरकारच्या अहिंसक मार्गाच्या भीतीला न जुमानता केलेले आंदोलनं आणि त्यांच्या मागणीला आलेले यश म्हणजे हुकूमशाहीवर लोकशाही मार्गाने मिळविलेला विजय आहे असे सामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे. विद्यार्थ्यांनी विश्वगुरुला झुकविले! मोदी सरकार पोरांसमोर नतमस्तक ; धर्मेंद्र प्रधानांना खुर्चीवरून खाली खेचले! अशा प्रतिक्रिया साधारण माध्यमांवर व्यक्त केल्या जात आहेत.

 देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक गट आणि विरोधी पक्षांनी उभारलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करत विद्यार्थ्यांना उद्देशून एक खुले पत्र जारी केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, " गेल्या चार दशकांपासून ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा त्यांनी नेहमीच आदर केला आहे. NEET-UG परीक्षेतील अनियमिततेची दखल घेत केंद्र सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले, प्रकरण सीबीआयकडे सोपविले आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतला. सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम केले. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि परीक्षा माफियांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकार कटिबद्ध" अशा भावना राजीनामा देत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केल्या.

धर्मेंद्र प्रधान हे पुढे म्हटले की, मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे त्यांना वैयक्तिकरीत्या दुःख झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही कायदेशीर किंवा राजकीय संघर्षात अडकू नये, हीच त्यांची भूमिका आहे. देशातील युवकांची शक्ती ही भारताची खरी ताकद असून त्यांना भ्रमित करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा पत्रात त्यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन, मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यातही देशसेवा आणि युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी राजीनामा दिला. असे असले तरी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी मोदी सरकारने घेतला वेळ, आंदोलनात विद्यार्थ्यांवर केलेला लाठी हल्ला, त्यात शहीद झालेली विद्यार्थिनी , अधू अपंग झालेल विद्यार्थी, तरुणांचा वाया गेलेला परत मिळणार आहे का हा प्रश्न अनुत्तरित असून त्यामुळे सरकारची विश्वासार्हता जनमानसात कमी झाली आहे. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित संघटनांनी या घडामोडीला "विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय" असे संबोधले असून, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याची मागणी कायम ठेवली आहे.

अभिजित दिपके च्या रूपाने एका मराठी पोराने दिल्लीत नेतृत्व करून केलेले आंदोलन म्हणजे दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा अशा भावना देखील मराठी मराठी लोकं व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा