Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, १२ जुलै, २०२६

कंपनी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे आदेश : मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कधी? हा प्रश्न अनुत्तरितच 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डे पो दुर्घटनेबाबत प्राथमिक चौकशी चे काम तातड़ी ने पूर्ण करावे व संबंधित कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा सूचना आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्याना दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

मोशी कचरा ढिगारा कोसळून ईमारत दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि सबंधित कंपनीने मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली खरी परंतु त्यातून त्यांचा जीव तर परत येणार नाही केवळ आर्थिक दिलास यातून मिळेल असे असले तरी यातील दोषींवर कडक कारवाई कधी होणार हा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंपनीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले खरे परंतु या गंभीर दुर्घटनेस कारणीभूत असलेले अधिकारी यांच्यावर देखील मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहेत. कारण एवढे मोठे अनधिकृत बांधकाम तसेच नियमांची पायमल्ली करून उंच च्या उंच कचऱ्याचे महाकाय डोंगर होईपर्यंत सबंधित विभागाचे महापालिका अधिकारी काय झोपी गेले होते का की त्यांनी जाणून बुजून काही लाभासाठी दुर्लक्ष केले ज्याचा परिणाम हा मोठा गंभीर अपघात घडला. त्यात ९ कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले. मोशी कचरा ढिगारा दुर्घटनेत संबंधित कंपनी बरोबर दोषी अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना आणि सामान्य नागरिक करीत आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कोणालाही सोडता कामा नये त्यांना शिक्षा आली पाहिजे अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. आता येणारा काळच ठरवेल की महापालिका आयुक्त कुणा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करतील की सरसकट दोषींवर कारवाई करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा