Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

बाल कीर्तनकार स्वराली ताई जाधव यांचे कीर्तन


| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक ७ : वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपल्या अमृतवाणीने कीर्तन करून सर्वांना भुरळ घालणारी ह भ प स्वरालीताई गोपाळ जाधव या कीर्तनकाराला मोठे होऊन शिक्षिका व्हायचे आहे, पण शिकूनही भक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प या बाळ कीर्तनकाराने केला आहे. मुंबई ताडदेव परिसरातील स्वरालीताई यांचे भव्य दिव्य कीर्तन झाले. रायगड जिल्ह्यातील परसुले ता. पोलादपूर या छोट्याशा गावातील त्या रहिवासी आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयातच स्वराली ला ईश्वरभक्तीचे वेड लागले. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. स्वरालीचे आई वडील गावी असतात. स्वरालीताईचे गुरुवर्य भगवाताचार्य हभप अविनाश महाराज रुबदे व तिच्या आई वडिलांनी स्वरालीला आध्यात्मिक व परमार्थाचे महत्त्व पटले. नंतर तिची धार्मिक ओढ पाहून आई वडिलांनी स्वरालीला वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले. शालेय शिक्षणही त्याचबरोबर सुरू होते. तेव्हा स्वराली फक्त ८ वर्षांची होती. स्वरालीला मोठे होऊन शिक्षक होण्याची इच्छा आहे. सकाळी अभ्यासानंतर १० ते ५ शाळा पूर्ण करून सायंकाळी पूर्णवेळ धार्मिक ग्रंथाचे वाचन करते. आजपर्यंत पन्नासहून अधिक कार्यक्रम स्वरालीने केले आहेत. कीर्तनातून व्यसनमुक्तीचा ध्यास तिने घेतला आहे. स्वराली प्रामुख्याने चालू घडामोडींचा वेध कीर्तनातून घेते. भावी पिढी व्यसनामुळे बरबाद होत असून देशाचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे स्वराली सांगते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा