Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

रविवार, ४ मे, २०२५

अक्षय्य तृतीया’निमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सक्षमा महिला बचत गटाच्या वतीने पारंपरिक पुरणपोळी स्टॉल

 

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ४ मे २०२५ : अक्षय्य तृतीया सणाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील परिसरात सक्षमा उपक्रमातील स्वयं सहायता महिला बचत गटाने समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्या मार्गदर्शनातून विशेष पुरणपोळी स्टॉल उभारला होता. या उपक्रमाचे आयोजन ‘ह’ प्रभागातील स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी केले होते. या उपक्रमाचा उद्देश सणाचे सांस्कृतिक महत्त्व साजरे करताना, महिलांच्या उद्योजकीय क्षमतेला चालना देणे हा होता.


 या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयं सहायता महिला बचत गटाने महापालिका कार्यालयाच्या परिसरात पुरणपोळीचा स्टॉल उभारला. यामध्ये लक्ष्मी महिला बचत गटातील पूनम म्हेत्रे आणि यशश्री महिला बचत गटातील कालिनी मदने या सदस्यांनी पुढाकार घेतला. 

प्रारंभी पुरणपोळ्या घरून तयार करून विक्री करण्याचा या महिलांचा विचार होता. मात्र, नंतर थेट स्टॉलवर पुरणपोळ्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी पुरणपोळ्या बनविण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी देखील गर्दी झाली होती. दोन तासांमध्येच येथे खवय्यांनी पुरणपोळी खाण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी खवय्यांना थाळी सजवून देण्यात आली ज्यामध्ये पारंपरिक पुरणपोळी, आमरस, भात, भजी, आमटी अशा खाद्यपदार्थांचा समावेश होता.


समाजविकास विभागाच्या सहकार्यातून राबविलेल्या या उपक्रमातून महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ विक्री उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील मदत झाली. भविष्यात अशा उपक्रमांना आणखी प्रोत्साहन देण्यात येईल आणि या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातील, असे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा