| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड शहरालगत असलेला मुंबई पुणे बंगलोर हायवे याठिकाणी आणि येथून हिंजवडी आयटी पार्क तसेच मुंबई, सातारा आणि डांगे चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या भूमकर चौकात सतत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणच्या परिसरामध्ये नियमित अर्धा अर्धा तास ट्रॅफिक कोंडी होत असते. कधी कधी तर तासनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. येथील वाहतूक कोंडी आणि वाहतुक समस्या कायमस्वरूपी सुटावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नरेंद्र माने (अध्यक्ष : संजय गांधी निराधार योजना , चिंचवड) यांनी सविस्तर उपया सुचविले असून त्यासंबंधी चिंचवड चे आमदार शंकरशेठ जगताप यांना पत्र लिहिले आहे. ते सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे:
मा, आमदार
श्री. शंकरभाऊ जगताप
चिंचवड विधानसभा सभा
विषय :भूमकर चौक, भुजबळ चौक ते हिंजेवाडी आय टी पार्कचा ट्रॅफिक चा प्रश्न सोडवणे बाबद.
मोहोदय,
मी आपणास वरील विषयी विनंती पूर्वक नमूद करतो की,
मुबंई, पुणे पिंपरी चिंचवड मार्गे हिंजेवाडी आय टी पार्क येथे जाणारे हायवे खालील मुख्य जे चौक आहेत. ते भुमकर चौक, भुजबळ चौक, ताथवडे, पुनावळे येथील हायवे खालील भुयारी मार्ग अगोदर मोठे करावे.व डिकेथ मॉल ते इंदिरा कॉलेज शनिमंदिर वाकड-ताथवडे शिवेवर जो ३० मीटर चा डीपी आहे. तिथे नवीन एक हायवे खाली नियोजित प्रशस्त भुयारी मार्ग तयार करावे.
जेणेकरून हिंजेवाडी येथून येणाऱ्या गाड्या लक्ष्मी चौक- विनोदे वस्ती-अक्षरा स्कूल- शनिमंदिर मार्गे हायवे ला जाणारे डाव्या बाजूने मुबईला जातील. डांगेचौका कडे येणारी वहाणे नवीन भुयारी मार्गे डांगेचौक-पिंपरी चिंचवड-भोसरी कडे जातील
(सूचना :वाकड येथील स न १२३ व १२४ मधून जाणारा १८ मीटर डीपी रोड लागलीच विकसित करावा.हा रस्ता विकसित केल्यास ताथवडे येथे अनेक कॉलेज आहेत. त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना हा रस्ता झाल्यास कॉलेजला जाण्या-येण्यास सोयीस्कर होईल. तसेच फिनिक्स मॉल कडे जाण्या-येण्या करिता सोपे होईल.
तसेच १२३, १२४, १२५ वाकड- ताथवडे शिवेवरील ३० मीटर रस्ता विकसित करावा. जेणेकरून इंदिरा कॉलेज व मुबंई कडून येणार ट्रॅफिक IIEBM कॉलेज लगतून काळाखडक झोपडपट्टीच्या पाठीमागील बाजूकडून डायरेक्ट डांगेचौकाकडे जाईल.
त्यामुळे भूमकर चौकातील ताण कमी होईल.व ट्रॅफिक कमी होईल.
नुसते हिंजेवाडी, माण, मारुंजी येथील रस्ते मोठे करून ट्राफिक कमी होणार नाही.
तर मुबंई व पुण्याकडून येणाऱ्या -जाणाऱ्या हायवे वरील-खालील नवीन भुयारी मार्गाच नियोजन करून वरील रस्ते विकसित करावे ही विनंती.
आपलाच
श्री. नरेंद्र बळीराम माने
अध्यक्ष :संजय गांधी योजना समिती चिंचवड विधानसभा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा