Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २९ जुलै, २०२५

डांबून ठेवल्याच्या मुलीची सुटका झाल्यापासून ती पीडिता आली मिडियासमोर आणि सर्वकाही सांगितले!

चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल: पत्रकार परिषद घेऊन पीडित मुलीने मांडली कैफियत!


अखेर डांबून ठेवलेली पीडित मुलगी अली मिडिया समोर!

| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २९ : तोंड ओळख असलेल्या ओळखीच्या कुटुंबातील एक मुलगी अपहरण करून अहिल्यानगर जिल्ह्यातून थेट पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आणली जाते आणि तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने लग्न करण्यासाठी दबाव आणला जातो. जेव्हा ती लग्नाला नकार देते तेव्हा तिला एका खोलीत डांबून ठेवले जाते आणि इच्छुक मुलगा त्या अंधार कोठडीत तिच्यावर बलात्कार करतो तेव्हा आपल्या राज्यात महिला मुली सुरक्षित आहेत का असा गंभीर प्रश्न पडतो !


पीडित मुलीने सांगितलेली हकीकत अशी की, दिनांक ३ जुलै रोजी आळंदी येथे आंधळे कुटुंबियांनी त्या १९ वर्षीय मुलीवर बळजबरीने लग्न करण्याचा दबाव आणला. आंधळे कुटुंबात लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित कुटुंबीयाने तिला खोलीत कोंडून मुलगा अण्णासाहेब यालाही आत सोडले व आरोपी अण्णासाहेब आंधळे याने तिच्यावर बलात्कार केला. तिला तिथेच डांबून ठेवले. खोलीत आढळून आलेल्या मोबाईलवरून तिने ११२ नंबरवर फोन केला. पोलिस तत्काळ तिथे आले व त्या पीडित तरुणीची सुटका करून तिच्या आई वडीलांना गावावरून बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात सोपवले. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आळंदी पोलिस स्टेशनमध्ये लगेच गुन्हा नोंद झाला पाहिजे होता परंतु पीडित मुलीने भितीपोटी आणि आपल्या घरच्यांची आणि स्वतः ची बदनामी होऊ नये म्हणून आळंदी पोलिसात तिचे म्हणणे मांडू शकली नाही. त्यामुळे त्याच दिवशी गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

मुलगी वडील आणि काकांसोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील तिच्या गावी गेली. परंतु आंधळे कुटुंबीय आपल्याला पुन्हा त्रास देतील त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे म्हणून पीडित मुलीने घडलेली हकीकत आई वडिलांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अहिल्यानगर जिह्यातील शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये ४ आरोपींविरोधात ७ जुलै ला गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून बाकी आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती पीडित मुलीच्या कायदेशीर सल्लागारापैकी एकाने दिली. अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे आणि एक वाहनचालक ज्याचे नाव माहीत नाही, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दिनांक ७ जुलै रोजी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीं विरोधात गुन्हा दाखल झाला असून, १९ वर्षीय पीडित मुलीचा जबाब मजकूर असा आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावात आई वडील, भाऊ काका असे आम्ही एकत्र राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाची उपजीवीका भागवतो. माझे वडील व मयत प्रल्हाद विक्रम आधळे हे मित्र होते त्यामुळे त्यांची पत्नी जनाबाई आंधळे व त्यांचा मुलगा नामे आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे रा. सोनेसांगवी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर याच आमचे घरगुती संबंध असल्याने त्याचे नेहमी आमच्या घरी येणे जाणे असायचे त्यामुळे मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होते.

दि.३/६/३०२५ रोजी सायकाळी ६.०० वा. चे सुमारास मी घरी एकटीच असताना जनाबाई प्रल्हाद आंधळे ह्या घरी आल्या व मला म्हणाल्या माझ्या सोबत कोणी नाही आपण शेतात जावुन परत येवु असे म्हणाल्याने मी जनाबाई असे आम्ही गावातून आडनदी येथील शेतात जात असतांना वाटेत उभी असलेली काळ्या रंगाची काडी क्र. एम. एच ४३ सी. सी. ७८१२ फोर व्हिलर ईर्टिगा गाडीतुन १) आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे २) प्रविण प्रल्हाद आंधळे व ३) गाडी चालवणारा एक अनोळखी इसम (नाव गाव माहित नाही) असे खाली उतरले व त्यांनी तसेच जनाबाई यांनी मला बळजबरीने गाडीत बसवले मी आरडा ओरडा केला परंतु त्यांनी मला दम दिला म्हणून मी शांत बसले. त्यानंतर अहिल्यानगर च्या पुढे जनाबाई ह्या गाडीतुन उतरून निघुन गेल्या. तेव्हा मी म्हणाले की, मला पण घरी जावु द्या तेव्हा आण्णासाहेब यांने पाण्यासारखी दिसणारी बाटली दाखवत म्हणाला की तु जर शांत बसली नाही तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकीन त्यामुळे मी भितीने गाडीत शांत बसुन राहिले. त्यांनतर त्यांनी मला दुसन्या दिवशी पहाटे ५.०० वा. चे सुमारास आंळदी पुणे येथे त्यांच्या भावकीतील सुनिता आंधळे यांचे राहत्या घरी घेवुन गेले, तेव्हा मला इथे कशाला आणले असे आण्णासाहेब याला विचारले असता त्यांने सांगीतले की मला तु खुप आवडते मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे. तेव्हा मी त्यास म्हणाले की मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचे मला माझ्या घरी नेवून सोडा, तेव्हा आण्णासाहेब आंधळे हा म्हणाला कशी काय लग्न करत नाही पाहतोच तुझ्याकडे .असे म्हणाल्याने मी रडु लागले व आरडा ओरडा करु लागल्याने सुनिता आंधळे व प्रविण आंधळे यांनी मला व आण्णासाहेब आंधळे यास एक खोलीत डांबून ठेवले. तेव्हा आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यांने माझ्या सोबत बळजबरीने शरीर संबंध कले, त्यानतर काहिवेळाने बंद खोलीत मला मोबाईल दिसल्याने मी तो मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनच्या ११२ ह्या नंबरवर फोन केला. त्यानंतर सकाळी ८.०० वा चे सुमारास आंळदी येथील पोलीस तेथे आले व त्यानी मला व आण्णासाहेब आधळे यास बाहेर काढले व आम्हाला तसेच प्रविण आंधळे अभिमन्य आधले व इतर एक अशांना आळंदी पोलीस स्टेशन येथे घेवून गेले. मला विचारपूस करू लागले परत मी घाबरल्यामुळ त्याना काहिएक सागीतले नाही. मला माझ्या घरी नेऊन सोडा असे म्हणाले , तेव्हा त्यानी माझा तसा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर सकाळी आले. तेथील पोलीसांनी मला माझे वडील यांच्या ताब्यात दिले. वडील संजय व काका कैलास असे मला आमचे राहते घरी शेवगाव तालुक्यातील माझ्या गावी घेऊन आले. तेव्हा मी घाबरलेली होती व माझे वडील मला मारतील या भितीने मी त्यांना माझ्यासोबत घडलेला काहिएक प्रकार सांगीतला नाही, आण्णासाहेब आंधळे व त्यांचे घरचे पुन्हा मला त्रास देतील या भितीने मी माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार माझे वडील संजय पातकळ यांना काल दि. ७/७/२०२५ रोजी सांगीतला व मला त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यायची आहे असे म्हणाल्याने ते मला शेवगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता घेवुन आले. तरी दि.२/६/२०२५ रोजी सायकाळी ६.०० वा. चे सुमारास मी राहत्या घरी एकटी असताना 1) आण्णासाहेब प्रल्हाद अधळे 2) प्रविण प्रल्हाद आंधळे व 3) गाडी चालवणारा एक अनोळखी इसम (नाव गाव माहित नाही) रा.सनिसांगवी ता. शेवगाव यांनी मला एम. एच ४३ सी.सी. ७८१२ या इर्टिग गाडीतुन आंळदी पुणे येथे 4) सुनिता अभिमन्यु आंधळे 5) अभिमन्यु भगवान आंधळे दोन्ही रा. आळदी पुणे येथे त्यांच्या राहते घरी दि. ३/६/२०२५ रोजी पहाटे ५.०० वा. सुमारास लग्न लावुन देण्यासाठी घेवुन गेले परंतु मी लग्ना करीता नकार दिल्याने त्यानी मला एका खोलीत डांबुन ठेवुन (1) आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याने माझ्या

सोबत बळजबरीन शारिरिक संबंध केले. म्हणून माझी वरील लोकांविरुध्द तक्रार आहे. माझी वरील फियांद मी वाचुन पाहिली असता ती माझे सांगणेप्रमाणे संगणकावर बरोबर टंकलीखीत केली आहे" अशाप्रकारे पीडित मुलीने पोलीस स्टेनमध्ये जबाब नोंदवून तक्रार दाखल केली आहे.

भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 : 64

भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 : 127(2)

'भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 : 87

भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 : 3(5)

या कलमा नुसार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेली काही दिवसांपासून पीडित मुलीला डांबून ठेवल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत होत्या. त्यामध्ये एक वारकरी शिक्षण संस्था चालिकेचा त्या पीडितेला डांबून ठेवण्यात मदत केल्याचा दावा देखील केला जात होता. तसेच संबंधित मुलगा आणि मुलगी यांचे अगोदरपासूनच प्रेम प्रकरण सुरू होते अशी देखील काही माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झालीं होती. या सर्व गोष्टींचा योग्य तो खुलासा जेव्हा होईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल.

परंतु, काल दिनांक २८ रोजी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन संबंधित पीडित मुलगी व तिच्या सहकाऱ्यांनी वकिलांच्या उपस्थितीत माहिती दिली आणि उपलब्ध FIR च्या संदर्भानुसार साध्य परिस्थिती लोकांच्या समोर उघड झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर