स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे पार पडला प्रेरणादायी सोहळा
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १४ : शिक्षण, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल ठरलेल्या ‘शिक्षण संजीवनी’ या राज्यस्तरीय मासिकाचे प्रकाशन सोहळा बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. श्याम भुर्के (ज्येष्ठ साहित्यिक), सौ. चंद्रलेखाताई बेलसरे (ज्येष्ठ साहित्यिका), श्रीमती. देवयानी वैदनकर (सामाजिक कार्यकर्त्या) या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. शंकर घनश्यामदास अंदानी (अध्यक्ष, इलाईट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, नवी दिल्ली), मा.ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे (जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज), मा. गोपाल दिवाकरन (संचालक, एच.पी.एस. प्रा. लि.), आणि मा. अॅड. विवेक खत्री (ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभात ‘शिक्षण संजीवनी’ मासिकाचे संपादक श्री. देविदास लिमजे, कार्यकारी संपादक डॉ. संजय जगताप, आणि संपादन मंडळाचे सदस्य श्री. दत्तात्रय उभे, श्री. राजीव सगर, श्री. रणजीत पवार, श्री. राजेश दिवटे हे देखील उपस्थित होते. अनेक नामवंत वाचक, लेखक, शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींची यावेळी उपस्थिती लक्षणीय होती.
प्रकाशनानंतर सर्व मान्यवरांनी मासिकाचा स्तुत्य उपक्रम म्हणून गौरव केला. शिक्षण, मूल्यविवेक, नवदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या मासिकाबद्दल आपली मते व्यक्त करत सर्व मान्यवरांनी याचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या मासिकामार्फत संजीवन विचारांची पेरणी होत असून, हे मासिक भविष्यात राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतर वाचनप्रिय वर्गासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानत मासिकाच्या संपादकीय टीमने असेही सांगितले की, मासिक फक्त प्रकाशनापुरते मर्यादित न राहता ते राज्यातील प्रत्येक ज्ञानप्रेमीपर्यंत पोहोचविण्याचे व्यापक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर मासिक शिक्षणक्षेत्रातील नवे विचार, प्रयोगशील उपक्रम, शिक्षकांची कर्तृत्वकथा, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, तसेच समकालीन सामाजिक-सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारे लेख यांचा संग्रह आहे. ‘शिक्षण संजीवनी’ हे मासिक म्हणजे शिक्षण क्षेत्राला नवा दृष्टीकोन देणारी एक चळवळ आहे, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपादन मंडळ, स्वयंसेवक, आयोजक व सायन्स पार्क व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा