महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सोनू साठे यांच्या गायनाच्या व प्रबोधनत्मक कार्यक्रमाला उत्सपूर्त प्रतिसाद
आदर्श पत्रकार व आदर्श सामाजिक कार्यकर्ते यांना पुरस्कार प्रदान
| सांगावा न्यूज | दि, २ : लोकशाहीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव दिनांक ३० ऑगस्ट रोजी संजय गांधी नगर मोशी सावता माळी कार्यालयात सपंन झाला. महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महारष्ट्राचे लाडके गायक सोनू साठे यांचा गीत गायन असा प्रबोधनात्मक कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. यावेळी उपस्थित भोसरी विधानसभा आमदार मा महेशदादा लांडगे, माजी आमदार, विलाससेठ लांडे, व युवा नेते रविभाऊ लांडगे, नगरसेवक वसंत बोराटे, युवा नेते अतिष बारणे, युवा नेते निखिल बोऱ्हाडे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते निलेश भाऊ बोराटे, युवा नेते गणेश सस्ते, लहुजी टायगर सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे, क्रांतिवीर विचार मंच संस्थापक अध्यक्ष अविनाश भाऊ शिंदे, रिपाई व्यापारी आघाडी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धीरज सकट, सामाजिक कार्यकर्ते सतीश भावाळ, ऍडव्होकेट क्षीरसागर यांच्या सह समाज बांधव मोठ्या सख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान समाजासाठी कार्य करत असणाऱ्या कर्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये हिराबाई किसनराव लांडगे आदर्शमाता सन्मान पुरस्कार , स्व, अंकुशराव लांडगे समाजसेवा पुरस्कार, साहित्यरतन लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे समाजरत्न सन्मान पुरस्कार असे पुरस्कार देण्यात आले. यामध्ये
या पुरस्काराचे मानकरी दमदार आमदार महेशदादा किसनराव लांडगे यांना साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व माजी आमदार विलास सेठ लांडे यांना साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याच बरोबर युवा नेते व नगरसेवक रविभाऊ लांडगे यांना स्व अंकुशराव लांडगे समाजसेवक सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. युवा नेते व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते निलेश भाऊ बोराटे यांचा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, नगरसेवक वसंत बोराटे यांचा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्काराने केला गेला, युवा नेते अतिष बारणे यांना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, शिवसंघर्ष ग्रुप चे युवा नेते गणेश भाऊ सस्ते यांचा सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सौ. नाणी कांबळे यांना स्व. हिराबाई किसनराव लांडगे आदर्शमाता सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले, विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांची आई माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांना देखील स्व. हिराबाई किसनराव लांडगे आदर्शमाता सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश भाऊ शिंद यांना देखील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे समाजरत्न सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, लहुजी टायगर सेना सोस्थपक अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे समाजरत्न सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, प्रतिकार न्यूज चे पुणे जिल्हा सपंदक नानासाहेब कांबळे यांचा देखील सन्मान साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आणाभाऊ साठे समाजरत्न सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व आदर्श पत्रकार पुरस्कार भीमराव बरकडे, वदंना जाधव, आणि विनय सोनवणे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रमासाठी उपस्थित समाज बांधवांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर गायक सोनू साठे यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजक माणिक पौळ, संपत आबा मांडरे, दत्ता बसवंत, अंकुश देढे, निलेश डोळस, दयानंद वेराग, महादेव लोखंडे, याच्या वतीने करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम खेडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक माणिक पौळ यांनी केले तसेच दत्ताभाऊ बसवंत यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा