ओबीसींच्या न्याय हक्कासाठी दिघीत उभी ठाकली संघर्ष समिती
| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक १३ : दिघी परिसरातील ओबीसी समाजातील नागरिकांनी आपले हक्क, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी निर्णायक पवित्रा घेतला आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ‘ओबीसी संघर्ष समिती’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.
बैठकीला विविध राजकीय पक्षांचे मूळ ओबीसी कार्यकर्ते, समाजातील मान्यवर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने ठराव घेतला की, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर आता केवळ चर्चेत न थांबता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
ओबीसी संघर्ष समितीचे मुख्य मुद्दे :
ओबीसी जोड अभियान दिघी बोपखेल प्रभागात प्रभावीपणे राबवणार
ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी ठोस लढा
होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांन च्या निवडणुकीत मूळ ओबीसीलाच प्रतिनिधित्व मिळावे.
बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
शैक्षणिक व नोकरीतील संधी मधील कुठलेही बदल होऊ नये म्हूणन शासनावर दबाव
अन्यायकारक निर्णयांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन
समितीचे पदाधिकारी निवडताना सर्वांनी एकमुखाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. “ओबीसी समाजाच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून सर्वजण एकत्र आलो आहोत. आता ही लढाई निर्णायक टप्प्यात नेऊन समाजाला न्याय मिळवून देणारच,” असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या अखेरीस येत्या काही दिवसात ओबीसी समाजाचा मेळावा तसेच जिल्हा व राज्य पातळीवर मोठे मोर्चे काढण्याची घोषणा करण्यात आली.
यामुळे दिघी परिसरात ओबीसी समाजात एक वेगळीच चळवळ उभारली जात असून, ही लढाई किती व्यापक रूप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा