Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, पुणे दि. ३० एप्रिल २०२६ : साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे थेरगाव चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या, विविध ९ भाषेतील ५५१ पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे. तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा पुस्तक संग्रह करणारे संभाजी बारणे हे एकमेव आहेत असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यामुळे सर्व शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाजी बारणे हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील उच्चशिक्षित रहिवाशी असून शेती व बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध धातूंमधील विविध आकारांच्या ७० पेक्षा जास्त मूर्ती देखील आहेत. केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेल्या दोन रुपयांच्या दीड हजार नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. ही पुस्तके आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, नाणी नागरिकांना पाहण्यासाठी त्यांच्या थेरगाव येथील कार्यालयात रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत. थेरगाव गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी बारणे यांनी पुढाकार घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही पुस्तके वाचण्यासाठी व संदर्भ साठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचेही संभाजी बारणे यांनी सांगितले.
    शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण साहित्य अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारे बारणे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील १९७८ सालापासून २०२२ पर्यंतच्या आजी-माजी नगरसेवकांच्या १२०० व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला आहे. त्याची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये २०१९ मध्ये घेण्यात आली आहे. महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद आहेत. त्यांनी संपादन केलेल्या "पिंपरी चिंचवड वैभव" या कविता संग्रहाचे ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा