Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या पोर्टल व यु ट्यूब चॅनलला राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करणार : एस. एम. देशमुख

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न


| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २७ : इलेक्ट्रॉनिक मिडिया पेक्षा डिजिटल मीडियावर आलेल्या बातम्यांचे वाचक व व्हिवर्स वाढतं आहे. त्यामुळे डिजिटल मीडियाची विश्वासार्हता ही आता वाढतं आहे. राज्याभरातील डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून 'डिजिटल मिडिया परिषदे'च्या माध्यमातून संघटन केले आहे. पुढील काळात विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या पोर्टल व यु ट्यूब चॅनलला राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा एस. एम. देशमुख यांनी केली. 

    अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पुणे शहरात संपन्न झाली. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील ७० प्रमुख सदस्यांच्या उपस्थित महत्वाच्या विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. या बैठकीला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. 

     पुणे शहरातील वानवडी येथिल जांभुळकर गार्डन येथे पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत पुणे महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गव्हाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी प्रज्ञा आबनावे यांची नियुक्ती एस.एम.देशमुख यांनी केली. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघाशी आपला संघ सल्लंगन होत असल्याचे जाहीर केले. 

    बैठकीतील परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश निकाळजे, हणुमंत देवकर, चिंतामणी क्षिरसागर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, संजय बारहाते, विनोद माझिरे, पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे, रवी पाटील, रविंद्र वाळके, ॲड. संजय पाटील यांनी सूचना मांडत आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रावणी कामत, कार्यालयीन सचिव जिवन शेंडकर उपस्थित होते. 

      बैठकिचे प्रास्ताविक व इतिवृत्त वाचन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले. बैठकीतील उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एम. जी. शेलार यांनी मानले. बैठकीचे यशस्वी नियोजन जिल्हा संघटक सुनील वाळूंज व प्रमोद गव्हाणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर