| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक १७ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये घंटा गाडीवर कार्यरत असणारे सफाई कामगार मुकेश कोंडीराम रणपिसे रा. आकाश किरण अपार्टमेंट, पिंपळे गुरव पुणे, वय ४९ वर्षे हे (ता. १७) रोजी सकाळी अंदाजे ९.३० वा. वाकड येथील सिल्वर जिम रोड येथे साफ सफाईचे काम करत असताना स्कार्पियो या चार चाकी गाडीने त्यांना उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी मनोहर शितकल त्यांच्यासोबत काम करत होते. शितकल आणि स्कॉर्पिओ चालक यांनी रणपिसे यांना अपघात झालेल्या गाडीतूनच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
सदरील स्कॉर्पिओ चालक आणि स्कॉर्पिओ चार चाकी गाडी वाकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून स्कार्पिओ चालक याच्यावर गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती वाकड पोलिसांकडून न्यूजच्या प्रतिनिधीला दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाकड पोलीस स्टेशनच्या येथे सफाई कामगार, अधिकारी हे जमले होते.
मुकेश रणपिसे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये १९९७ पासून कामावर रुजू झाले होते. त्यांनी पालिकेमध्ये २८ वर्षे नोकरी केली होती. ते अविवाहित ते पिंपळे गुरव येथे ते भावाकडे राहायला होते. काही महिन्यापूर्वी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये परमनंट झाले होते.
"सफाई कामगारांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू होणे दुर्दैवी" अशी प्रतिक्रिया उप आयुक्त सचिन पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये घंटा गाडीवर कार्यरत असणारे सफाई कामगार मुकेश कोंडीराम रणपिसे हे अत्यंत प्रमाणिक आणि कष्टाळू होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू होणे दुर्दैवी बाब आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये २८ वर्षे सेवा दिली आहे. ते परमनंट झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा